वरोरा तालुक्यातील टेमुर्डा परीसरात रविभाऊ शिंदे यांनी केले मास्क, पीपीई किट व सॅनिटायजरचे वितरण

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकरीता भद्रावती येथून लोकोपयोगी कार्याची सुरुवात करुन ग्रामीण भागात मास्क, पीपीई किट व सॅनिटायजरचे वाटप करणे सुरु असतांनाच दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवि शिंदे यांनी आज (दि.१४) ला टेमूर्डा-खांबाडा परीसरात मास्क, पीपीई किट व सॅनिटायजरचे वितरण केले.
वरोरा तालुक्यात पीएससी अंतर्गत आयसोलेशन सेंटर उघडण्यात आलेले आहे. दरम्यान कोसर एस या अंतर्गत टेमुर्डा आसाणा, लोणारा, खांबाळा या सेंटरवर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बोरीकर यांनी डॉक्टरांसोबत चर्चा केली असता डॉक्टरांनी पीपीई किट, मास्क, सॅनिटायजर व पल्स मीटर ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी विनंती केली.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दत्ता बोरेकर यांनी या साहित्याबाबत वरोरा येथे विचारणा केली पण साहित्य उपलब्ध होवू शकले नाही. त्याचवेळी घोडपेठ, आष्टा, मुधोली येथे दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष तथा संचालक रविभाऊ शिंदे यांनी मास्क, सॅनिटायजर आदींचे वाटप केल्याची माहिती दत्ता बोरेकर यांना झाली. तसेच ताबडतोब बोरेकर यांनी रविभाऊ शिंदे यांना भ्रमणध्वनी केला. एका कॉलवर रविभाऊ शिंदे व वसंताभाऊ मानकर हे साहित्य घेऊन आज (दिनांक 14/5/2021) ला टेमुर्डा येथे ठिक 10 वाजता पोहोचले.
टेमुर्डा येथील ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत जिल्हा परीषद शाळेसमोर सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बोरीकर, माजी जि.प. सदस्य सुरेश टेकाम, डॉ. आशीष देवतळे, सुरज निब्रड, त्रिशूल घाटे, अशोक गेडाम, गजानन गोवारदीपे, मंगेश भागडे, अमीत चिवंडे, संजय गारघाटे, शुभम निखाते यांच्या उपस्थितीत सदर साहित्य सुपूर्द केले.
सोबतच भद्रावती तालुक्याप्रमाणेच वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने सामाजिक हेतूने मागणी केल्यास आवश्यक ते सहकार्य करु असे आवाहन रविभाऊ शिंदे यांनी यावेळी केले.
यावेळी दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बॅक, चंद्रपुर चे माजी अध्यक्ष तथा संचालक श्री. रविंद्र शिंदे यांनी सरपंचांसोबत संवाद साधुन गावाच्या आरोग्यविषयी माहीती जाणून घेतली. तिथल्या अडीअडचणी ऐकुन घेवुन सरपंच तथा उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना स्वत: सुरक्षित राहुन गावकरी मंडळींना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यास सांगितले. कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत काहीही मदत लागल्यास हेल्प लाईन नंबर सुध्दा दिला. लॉकडाऊन चे कडक नियम पाळा. गावामधे दवंडी पिटून कोविड-१९ च्या सुचना दया. वेळोवेळी आरोग्याची काळजी घेण्याचे, ताप खोकला व आरोग्य विषयक कोणतेही दुष्परिणाम दिसताच क्षणी वैदयकीय सल्ला घ्या. अशाप्रकारे सुचना केल्या आहेत.
तालुक्यातील गावागावातून कोरोनाला हद्दपार करण्याचे आवाहन यावेळी रविंद्र शिंदे यांनी केले. त्यासाठी हवे ते सहकार्य भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार करेल, असेही सांगितले.