डॉ. महेश पापड़कर यांचे निधन

प्रतिनिधी /अंकुश पुरी

देसाईगंज : शहरातील सर्व सामन्यांचे डॉक्टर म्हणून परिचित असलेले डॉ महेश पापड़कर यांचे नागपुर येथील खाजगी इस्पितळात निधन झाले ते 46 वर्षाचे होते. मागील 15 दिवसापासून त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होता. प्रकृति खालावल्या मुळे त्यांना नागपुर येथे रात्री हलविण्यात आले. गुरुवारला दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मागे आई वडील, पत्नी 1 मुलगा 1 मुलगी, 2 भाऊ , वहिनी असा परिवार आहे.