माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाची वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण : व्हिडीओ वायरल – मुलगा लारेन्स गेडाम यास अटक

 

प्रतिनिधी /अंकुश पुरी

आरमोरी : विधानसभा क्षेत्राचे कॉंग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लारेन्स गेडाम याने आरमोरी शासकीय कोवीड सेंटरवर कर्तव्यावर असलेले डॉ अभिजित मारबते यांना काल मारहाण केली त्यामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देवळीचे आ. रणजित कांबळे यांचे वर्धाच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फोनवरून अपशब्द वापरून केलेले संभाषण ताजे असतांनाच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसच्या माजी आमदाच्या मुलाने कोवीड सेंटरवर कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हात उचलल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतचा व्हिडीओ हि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे.
या आधीही या माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलगा विधानसभा निवडणुक काळात प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या अपहरणाच्या गुन्ह्यात फरार होता.
आरोपीला लारेन्स गेडाम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आयपीसी आणि महाराष्ट्र शासन सेवा सेवा कर्मचारी आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार आणि नुकसान किंवा मालमत्ता हानीचा प्रतिबंध) अधिनियमातील कठोर, अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा नोंदविला जात आहे.