मृत शेतमजूराच्या पत्नीला दहा हजार रुपये रोख रकमेचा धनादेश

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

दि . चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कल्याण निधी या योजने अंतर्गत व सह . बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने आष्टा येथील शेतकरी पत्रु पडवे यांचे विद्युत करंट लागल्याने निधन झाले.त्या मृत शेतमजूराच्या पत्नीला दहा हजार रुपये रोख रकमेचा धनादेश चंदनखेड़ा येथील शाखेतून मदतिचा हात म्हणून देण्यात आला.

दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी शेतमजुरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असून जिल्हा बँकेच्या भद्रावती तालुक्यातील चंदनखेड़ा शाखेने सामाजिक बांधीलकी जोपासत मा. अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्या प्रयत्नाने संचालक रविंद्र शिंदे यांच्या माध्यमातून दि . 12 मे रोजी बँकेच्या दालनात शेतकरी कल्याण निधी अंतर्गत आष्टा येथील शेतकरी शेतमजूर पत्रु दसरू पडवे यांचा शेतात काम करताना विद्युत करंट लागल्याने मृत्यु झाला. त्यांची पत्नी श्रीमती ज्योती पत्रु पडवे ला दहा हजार रूपयांचा धनादेश देवून मदत दिली.

याप्रसंगी आष्टा आदिवासी संस्थेचे संचालक बाळा साहेब पडवे, संस्थेचे व्यवस्थापक अश्वीन हुलके साहेब, बैंकेचे व्यवस्थापक मुन्ना शेख, राजकुमार बुराण, निरक्षक पवन ठाकरे, रोखपाल येसेकर तथा गणेश जांभुळे, शेख नबी, भारत पंदरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम चे मार्गदर्शन करतांना मुन्ना शेख यांनी बैंकेच्या विविध कल्याण योजनेवर मार्गदर्शन केले. या शिवाय धानाचे पुंजने जळून नुकसान होणे, बैल मृत्युमुखी पडणे, वीज पडून जीवहानी होणे, जंगली जनावराच्या हल्यात मृत्यू होणे अशा घटना घडल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून घ्यावी असे आवाहन बैंकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी केले आहे.