मा.ना. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्याकडे जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फत कोव्हक्सीन लस उपलब्ध करुन देण्याची आपचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांची मागणी.

 

                संपादक // अनिकेत खरवडे
गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता अतिदुर्गम विस्ताराने मोठा आहे. कोव्हक्सीन लस पहिला डोस घेऊन बरेच दिवसाचा कालावधी लोटुन गेला आहे. कोव्हक्सीन लस दुसरा डोस करीता नागरिकांना विविध लस केंद्रावर वारंवार चकरा मारून वेळेचा खेळखंडोबा करून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दिवसे दिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत खेडापाडात वाढ होत आहे. सर्दी,तापाची साथ असुन वैज्ञानिक शास्त्रज्ञानाच्या निष्कर्षनुसार जुलै,ऑगस्ट महिन्या मध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. दळणवळण व नेटवर्क साधनाअभावी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वेळेवर संपर्क होऊ शकत नाही. संभाव्य परिस्थितीचा विचार करून नागरिकांना कोव्हक्सीन लस दुसरा डोस अत्यंत गरजेचा आहे. आवश्यकतेनुसार शक्य तितक्या लवकर आपल्या स्तरावरून पाठपुरावा करून कोव्हक्सीन लस उपलब्ध करून देण्याची मागणी आम आदमी पार्टी गडचिरोली वतीने करण्यात आली आहे.