बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
आज दिनांक 11/05/2021 रोजी ICICI फाऊंडेशन तर्फे बल्लारपुर शहरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव बघता, सामाजीक बांधलकीचे खरे उदाहरण देत बल्लारपुरातील नागरिकांकरिता 2(दोन) ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करुण देत बल्लारपुर चे नगराध्यक्ष यांच्या प्रमूख उपस्थितीत नगर परिषदेला हस्तांतरित केले. यावेळी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी ICICI फांऊडेशन च्या सामाजीक बांधलकी पोटी केलेल्या सहकार्या बद्दल आभार मानले. या प्रसंगी न. प. चे मुख्याधिकारी श्री. विजय सरनाईक,ICICI फाऊंडेशन चे प्रादेशिक प्रमुख श्री. विवेक बल्की व रिलेशन मॅनेजर श्री. वैभव माकोडे हे उपस्थित होते.