रविंद्र शिंदे यांची घोडपेठ ग्रामपंचायत ला भेट ग्रामपंचायतीला १००० मास्क तथा सॅनेटाईजर भेट

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बॅक, चंद्रपुर चे माजी अध्यक्ष तथा संचालक श्री. रविंद्र शिंदे यांनी आज (दि.११) ला ग्रामपंचायत घोडपेठ येथे भेट दिली. भेटी दरम्यान सरपंच श्री. अनिल खडके, उपसरपंच श्री. प्रदिप देवगडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. ईश्वर निखाडे, श्री. देवा शंकावर, व ग्रामसेवक तथा श्री. अशोक येरगुडे व श्री. वसंताभाऊ मानकर उपस्थित होते.
यावेळी श्री. रविंद्र शिंदे यांनी गावाच्या आरोग्यविषयी माहीती जाणून घेतली. तिथल्या अडीअडचणी ऐकुन घेवुन सरपंच तथा उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना स्वत: सुरक्षित राहुन गावकरी मंडळींना सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगितले.
याप्रसंगी ग्रामपंचायतीला १००० मास्क तथा सॅनेटाईजर भेट स्वरुपात दिले. कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत काहीही मदत लागल्यास हेल्प लाईन नंबर सुध्दा दिला. लॉकडाऊन चे कडक नियम पाळा. गावामधे दवंडी पिटून कोविड-१९ च्या सुचना दया. वेळोवेळी आरोग्याची काळजी घेण्याचे, ताप खोकला व आरोग्य विषयक कोणतेही दुष्परिणाम दिसताच क्षणी वैदयकीय सल्ला घ्या. अशाप्रकारे सुचना केल्या आहेत.