कोविड-19 संदर्भात तक्रांरींच्या निराकरणासाठी समिती गठीत बेड उपलब्धता, देयके व व्यवस्थेबाबत तक्रारी जाणून घेणार

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

चंद्रपुर जिल्ह्यात कोविड-19 संदर्भात बेड उपलब्धता, खाजगी कोविड रूग्णालयाकडून आकारली जाणारी देयके, रूग्णालय व्यवस्था, कोविड रूग्णांवर होणारे उपचार इ. कोविड संदर्भात कोरोना रूग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत केली आहे.

या समितीमध्ये अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड हे सदस्य असून सहय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे हे सदस्य सचिव आहेत.

नागरिकांनी त्यांच्या तक्रारी दूरध्वनी क्रमांक 274161, 274162 व ई-मेल आयडी क्रमांक covidcontrolroom.chanda@gmail.com यावर नोंदवाव्या असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.