5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परिक्षा पुढे ढकलल्या, निर्णय जाहीर

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

वर्ग 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परिक्षा पुढे ढकलन्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त श्री. तुकाराम सुपे निर्णय दिनांक: 10/05/2021 रोजी जाहीर केला आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मे मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा तूर्तास रद्द कराव्यात. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर परीक्षा आयोजनाबाबत विचार व्हावा. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अडकून न पडता पालक व विद्यार्थी यांना गावी जाणे सोयीचे पडेल. यासाठी तातडीने आदेश दिले आहे.

दि. 23 मे रोजी होणाऱ्या 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षांच्या आयोजनाबाबत राज्यभर विद्यार्थी, शिक्षकांमध्ये संभ्रम होता तो आता दुर झाला आहे.