आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतले आढावा शिधा पत्रिका व धनादेश वितरित केले जात प्रमाणपत्राचेही वितरण

 

संपादक // अनिकेत खरवडे

अहेरी:- आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सोमवार 10 मे रोजी तहसील कार्यालयात भेट देऊन तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून कोरोना परिस्थितीची आढावा घेतले. तसेच नाविन्यपूर्ण सोयी सुविधा व उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याच वेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय अर्थ कुटुंबसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. तसेच शिधा पत्रिका, जात प्रमाणपत्राचेही वितरित करण्यात आले.
याच प्रसंगी प्रत्येक नागरिक व अठरा वर्षांवरील युवक- युवती कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आवाहन आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी करून लसीकरण हेच कोरोनाला रोखण्यासाठी व जीव वाचविण्यासाठी वरदान व फायदेशीर ठरणार असल्याचेही आवर्जून सांगितले.
संजय गांधी, श्रावण बाळ योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी कटाक्षाने लक्ष घालण्याचे निर्देश संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या नव्याने गठीत झालेल्या तालुका समितीलाही निर्देश दिले.
आढावा बैठकीत अमोल मुक्कावार, लक्ष्मण येरावार, सुरेंद्र अलोने, किशोर करमे, पराग पांढरे, सुमित मोतकूलवार आदी उपस्थित होते.