जनता हायस्कूल ( डेपो शाखा) बल्लारपूर च्या साईबाबा ईमारतीमधील चॅनल गेट चा कब्जा गायब

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) बल्लारपूर च्या साईबाबा ईमारतीमधील चॅनल गेट ला वरच्या भागाला लावलेला कब्जा गायब झाला आहे.
मागील वर्षी चॅनल गेट चा खालचा आणि वरचा ताला लगातार तोडन्याची प्रक्रिया सुरू होती. त्याबाबत पोलिस स्टेशन, बल्लारपूर ला तक्रार दिली होती. दिनांक: 24/02/2021 रोजी सकाळी आणि रात्री पेट्रोलिंग लावलेली आहे, असे पोलिस विभागाने लिहून दिले.
दिनांक:10/05/2021 रोजी जाऊन पाहिले असता चॅनल गेट चा वरील कब्जा गायब झाला आहे. पोलिस प्रशासनाने पुन्हा लक्ष देऊन पेट्रोलिंग करुन शाळेची मालमत्ता संरक्षण करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून होत आहे.