भद्रावतीतील आणखी प्लाज्मा डोनरनी पुढे यावे.

 

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

श्री. रविभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनात कोविड रूग्णांना मदत करता यावी, करीता ‘कोविड-१९ आपात्कालीन’ नामक वाटस अप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. या ग्रुपमधे काल (दि.8) ला कोविड-१९ आपात्कालीन ग्रुप वर संदीप पाचभाई (घुटकाळा वार्ड) यांनी बी निगेटिव्ह ब्लड ग्रुपचा प्लाज्मा डोनरची आवश्यकता असल्याचा मॅसेज टाकून मदतीचे आवाहन केले. मॅसेज वाचून नेहमीप्रमाणे रविभाऊ शिंदे यांनी ताबडतोब त्यांची सूत्रे हलविली व प्लाज्मा डोनर साठी शोध घेणे सुरु केले. दरम्यान रुग्णाचे निकटवर्तीय गिरीश बुरड़कर यांनी देखील रविभाऊ शिंदे यांना प्लाज्मा डोनरची आवश्यकता असल्याचे भ्रमणध्वनीवर सान्गितले. रूग्ण सौ. माला संजय दासगुप्ता ही आयुध निर्माणी वसाहतीतील रहिवासी असुन सध्या आयुष्मान हॉस्पिटल कामटी येथे भरती असल्याची माहिती झाली. रविभाऊ शिंदे यांनी नागपुर येथे संपर्क साधून दोन युनिट बी निगेटीव्ह प्लाज्मा डोनरची आधीच व्यवस्था करुन घेतली, मात्र त्याएवजी दोन प्लाज्मा डोनर देणे क्रमप्राप्त होते.
रविभाऊ शिंदे यांच्या आवाहनाला साद देत संदीप पाचभाई, सुयोग भोयर यांनी प्रयत्न सुरु केले. त्यात संदीप पाचभाई यांच्या संपर्कातील कुणाल सातपुते यांनी प्लाज्मा डोनेट करण्याची तयारी दर्शविली व सोशल मिडीयाच्याच माध्यमातून मिळालेला दुसरा डोनर निलेश बिंजवे हा तयार झाला.
गिरीश बुरड़कर यांनी आपले वाहन तयार केले व सायंकाळी दोन्ही प्लाज्मा डोनरला घेवुन नागपुरला रवाना झाले. तिथे दोन्ही डोनरने प्लाज्मा डोनेटसाठी ॲन्टीबॉडी टेस्ट केली असता निलेश बिंजवे यांचीच प्लाज्मा डोनेटसाठी निवड झाली व कुणाल सातपुते यांची ॲन्टीबॉडी टेस्ट पात्रतेत न आल्याने त्यांचा प्लाज्मा घेण्यात आला नाही.
पहाटे ५ वाजता ही सर्व टीम परत आली. अशाप्रकारे आयुष्मान हॉस्पिटल येथील भद्रावतीच्या सौ माला संजय दासगुप्ता या रूग्णाला प्लाज्मा मिळाला व सहकार्य झाले.

भद्रावती तालुक्यातील प्लाज्मा डोनर समोर येत आहेत व रुग्णांसाठी जिवदान ठरत आहेत. ही बाब सुखावणारी होत आहे. आणखी प्लाज्मा डोनरनी पुढे यावे, हीच अपेक्षा आहे. इच्छुक प्लाज्मा डोनरनी संपर्क साधावा, आवश्यकता पडल्यास मदत घेता येईल.