गडचिरोली जिल्ह्यात कोवॅक्सीन लसींचा तुटवडा : लस घेणाऱ्यांची धावपळ

प्रतिनिधी/अंकुश पुरी

गडचिरोली : जिल्हात कोरोना लसीकरणास सुरूवात झाली. जिल्हयाला २ लाख लसींचा पुरवठा करण्यात आला होता त्यामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन लसींचा पुरवठा करण्यात अला. मात्र आता जिल्हाभरात कोवॅक्सीन लसींचा तुटवडा निर्माण झाला असल्याची बाब समोर आल्याने लस घेणाऱ्यांची धावपळ उडाली असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात सर्वप्रथम लसीकरणाला सुरूवात झाली तेव्हा ६० वर्षावरील नागरिक तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. मात्र आता १८ ते ४४ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणास सुरूवात झाली असली तरी जिल्हयात कोवॅक्सीन लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे लस घेणाऱ्यांची धावपळ उडाली आहे.
कोवॅक्सीन लसीचा पहिला डोज घेणारे नागरिक आता दुसऱ्या डोजच्या प्रतिक्षेत असतांना कोवॅक्सीन लसींचा तुडवडा लक्षात आला यामुळे लसीचा दुसरा डोज घेणाऱ्या नागरिकांमध्ये चितेचे वातावरण निर्माण झाले आहे. लसीचा पाहिला डोज घेतल्यानंतर दुसरा डोज घेण्याकरिता विशिष्ट कालावधी देण्यात आला होता मात्र पहिला डोज घेवून झाल्यावरचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर दुसरा डोज घेण्याकरिता गेले असता लसींचा तुडवडा निर्माण झाल्याची बाब समोर येताच लसीचा दुसरा डोज घेणाऱ्या नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून धावपळ निर्माण झाली आहे.
याबाबत विचारणा केली असता लवकरच लसींचा पुरवठा जिल्हाभरात करण्यात येणार असून नागरिकांनी चिंता करू नये असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.