वर्धा नदीची पाहणी, पाण्याचा प्रवाह वळवून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दिल्या सूचना

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

चंद्रपूर तालुक्यातील सात गावांचा पाणी पूरवठा खंडीत झाल्याची माहिती मिळताच सदर गावांच्या पूरवठा विहीरींना पाणी पूरवठा करणा-या धानोरा येथील वर्धा नदीची पाहणी करत पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याच्या सुचना संबधीत विभागाला केल्या आहेत. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चिंचाळा अंतर्गत धानोरा येथील वर्धा नदीची पाहणी केली. यावेळी वर्धा नदीच्या पाण्याचा प्रवाह दुस-या बाजूने वळला असल्याने ही पाणी टंचाई उध्दभवली असल्याचे निदर्शनास आले. याचा परिणाम पाणी पुरवठा करणार्या विहिरींवर झाला असुन या विहीरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे सदर गावांत भीषण पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.. त्यामूळे जेसीबीच्या माध्यमातून पाण्याचा प्रवाह बदलवित योग्य उपाययोजना करुनत्वरित उपाय योजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.