पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांची श्री मंगल कार्यालय कोविड सेंटरला भेट खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवाराच्या कार्याचे कौतुक

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात केवळ शहरातच नाही तर जिल्ह्यात भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवाराचे कार्य उल्लेखनिय आहे, असे उदगार ना. विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.७) ला श्री मंगल कार्यालय कोविड सेंटर येथील भेटीदरम्यान काढले.
भद्रावती येथील भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवाराच्या सामाजिक कार्याची दखल घेवुन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.७) ला स्थानिक श्री मंगल कार्यालय, शिंदे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, डॉ. विवेक शिंदे, जिल्हा बैंकचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना. वडेट्टीवार म्हणाले की, भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने मागील महिण्याभरापासून शहरात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उत्पन्न परीस्थितीपासून रूग्ण व सामान्य जनतेला दिलासा देणारे कार्य सुरु आहे. याचा फायदा जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील रुग्णांना होत आहे. याच त्यांच्या कार्याची दखल जिल्हाप्रशासनासह शासनस्तरावर झाली आहे. भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवार कडुन डॉ. विवेक शिंदे यांचे मार्गदर्शनात तथा जिल्हा बैंकचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांच्या नेतृत्वात संपुर्ण कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पाहता श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे ४०० बेडची सुसज्ज व्यवस्था असणारे सभागृह प्रशासनाकडे सुपुर्द केले आहे. त्यात जेवणाची सोय, सॅनिटायजरची सोय, प्रशासनाच्या मागणी प्रमाने औषधीची सोय व ॲाक्सिजन कॅान्सट्रेटर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हेल्पलाईनव्दारे रुग्णांना मार्गदर्शन-उपचार व जिल्हयाभरात रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यास सातत्याने मदतकार्य सुरु आहे. या व्यतीरिक्त रुग्णाकरीता डॅाक्टरच्या मागणीनुसार प्लाज्मा उपलब्ध करुन देणे व ग्रामीण रुग्णालयात त्यांचे नातेवाईकांच्या मागणी नुसार जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. हे सर्व कार्य खरोखर मानवसेवेचे आहे. समाजातील दानशुरांनी असेच समोर यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी सदर कार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. रूग्णांशी संवाद साधला. व तालुक्याच्या परीस्थितीचा आढावा घेतला.