शहरात झोननिहाय अधिक कोरोना केअर (CCC ) सेंटरची स्थापना करा सेवा कार्यात समोर या अशा मनपा आयुक्तांना सूचना भेटीदरम्यान केल्या

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

चंद्रपूर महानगरातील प्रत्येक झोनमध्ये कोरोना केअर सेंटरची तातडीने स्थापना करावी, जेणेकरून संक्रमित कुटूंबियांना या सेंटरवर रूग्णांना भरती करून त्यांच्यावर योग्य उपचारात्मक देखरेख ठेवणे सोईचे होईल. अशांना नास्ता, जेवनाची व्यवस्था करणेही सोईचे होईल. तद्वतच संक्रमितांची भरती होत असतांना त्यांची हिम्मत वाढेल. महानगरपालिका प्रशासन गतवर्षीच्या तुलनेत रूग्णसेवेच्या कार्यात मागे पडल्याचे जाणवू लागल्याने जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा संकटकाळात संक्रमितांची साखळी तोडण्यास समोर यावे. अशी सूचना मनपा आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेवून केली. तसेच वॅक्सीनेशन साठी नागरीकांची होत असलेली वणवन पाहता मनपाने वॅक्सीनेशन सेंटरची वाढ करावी अशा सुचना केल्या. या मागणीसाठी बाळु कोतपल्लीवार यांचे नेेतृत्वात शिष्ठमंडळ भेटले होते.
यावेळी आयुक्तासह, डाॅ. खंडारे, मनपा गटनेते वसंता देशमुख, प्रदीप किरमे, सचिन कोतपल्लीवार आदिंची उपस्थिती होती.