कोरोना च्या वाढ़त्या प्रादुर्भाव लक्ष्यात घेत जिल्हा युवक काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष वतीने गरजुना पुरवली मदत .

 

प्रतिनिधी/अंकुश पुरी

गडचिरोली: कोरोना महामारीच्या काळात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भोजनदान सुरू आहे. यासोबतच कोरोना संदर्भात २४ तास मदत कार्य सुरू आहे. यातच बाहेर जिल्ह्यातील हातावर पोट असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मारोडा येथील काही मजूर काम करण्यासाठी गडचिरोली येथे आले होते. त्यांनाही युवक कॉंग्रेसने पुढाकार घेऊन अन्नधान्याची मदत केली. यामुळे सहा मजुरांच्या कुटुंबाला मोठी मदत झाली.
कोरोनामुळे शासनाने लॉकडाउन सुरु केले. यामुळे हाताला लागलेले काम हिरावला गेला. बाजारपेठ बंद असल्यामुळे अन्नधान्याची त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली. ही बाब युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती दिली. याची माहिती मिळताच तात्काळ युवक काँग्रेस कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली. मजुरांना गरज असलेल्या तांदूळ, दाळ, तेल इत्यादी सामग्री घेऊन मदत केली.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, विनोद धंदरे, हेमंत मोहितकर, तोफिक शेख, संदीप ठाकरे, रवी गराडे, छत्रपाल भोयर, घनश्याम गोहणे यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.