स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समिती तर्फे रक्तदान शिबिर

 

प्रतिनिधी शुभम खरवडे
आरमोरी :- सगळीकडे कोरोणाचा हाहाकार माजलेला असतांनाच कोरोणाच्या या संकट काळात जिल्हा रक्तपेटी ला खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रक्ताची नितांत गरज बघता आज *दिनांक ६ मे २०२१ ला वेळ सकाळी १०:०० वाजता पासून ते १:०० वाजता पर्यंत स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समिती* तर्फे आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला बऱ्याच युवकांनी आपल्या covid-19 व्हॅक्सिनेशन घेण्याच्या आधीच रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले ज्यामध्ये रक्तदाते *अंकुश गेडाम, चेतन दडमल ,तुषार खापरे ,प्रशांत खापरे,दीपक सोनकुसरे, शुभम धकाते, प्रतीक रामटेके, अक्षय पिपरे, मोहित राऊत ,विपुल मिसार* सर्व रक्तदात्यांचे “स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समिती” *अध्यक्ष माननीय- चारुदत्त राऊत* यांनी आभार मानले या रक्तदान शिबिर शिबिराच्या आयोजना करिता *प्रफुल खापरे ,मनोज गेडाम ,फिरोज पठाण, रोशन दुमाने ,स्वप्निल सोरते, प्रशांत दोनाडकर, सारंग जांभुळे ,स्वप्निल बेहरे ,प्रल्हाद धोटे* सहकार्य केले याप्रसंगी दातांना अल्पोपहार वितरित करण्यात आले व जिल्हा रक्तपेटी च्या सर्व कर्मचाऱ्यांनी नवीन रक्तदात्यांना रक्तदानाचे फायदे व योग्य मार्गदर्शन केले.