‘त्या’ सूडाच्या राजकारणाची उच्चस्तरीय चौकशी करा तृणमूल काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन पंतप्रधानांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

पश्चिम बंगाल मध्ये नुकत्याच विधान सभा पार पडताच हिंसाचाराचे सत्र सुरू झाले. याचा निषेध नोंदवून त्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी घेऊन बुधवार(५ मे)ला स्थानिक गांधी चौक येथे निदर्शने करण्यात येऊन आंदोलन करण्यात आले.
माजी वित्त मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे यांनी केले. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, मनपा स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपा महानगर महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार ,रविंद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, विठ्ठलराव डुकरे, महेंद्र जुमळे, रामकुमार अकापेलिवार,संजय दाभाडे,आशिष ताजने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करणे गरजेचे आहे. निवडणुकीचा निकाल लागताच हिंसाचार उफाळला, यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. तृणमुल काँग्रेस बहुमत मिळाले म्हणून व सरकार आपली आहे म्हणून,भाजपाच्या कार्यकर्त्यांची हत्या व भाजपा समर्थकांना संपविण्याचे षडयंत्र करीत असेल ती ही बाब खपवून घेतली जाणार नाही. संपूर्ण बंगाल मध्ये हा प्रकार सुरू असून ही लोकशाहीची हत्या असून भारतीय संविधानाचा हा अपमान होय असे ते म्हणाले.
या वेळी बोलतांना महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या,बंगाल मधील हिंसाचारात मातृशक्तीलाही टार्गेट केले जात आहे.अब्रू लुटण्याचा घटना देखील ऐकिवात आहेत. सत्ता आली म्हणून आतंकवादी प्रमाणे वागणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब आहे.जनतेनेही अश्या घटनांचा निषेध केला पाहिजे. भारतीय जनता पार्टी चंद्रपुर(महानगर-ग्रामीण) जिल्ह्याच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करीत आहोत.असेही त्या म्हणाल्या.
यावेळी जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले.