प्रतिनिधी /अंकुश पुरी
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील विहिरीगाव येथे एका अवैध दारू तस्कराकडून दुचाकीसह २० लिटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. देसाईगंज पोलिस व मुक्तिपथ तालुका चमुने संयुक्तरित्या कारवाई केली असून आरोपीवर देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीवरून अवैध दारूची तस्करी होत असल्याची माहिती विहीरगाव येथील गाव संघटनेने दिली. त्यानुसार देसाईगंज पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या सापळा रचून विहीरगाव गावातून जाणाऱ्या एका संशयित दुचाकीस्वाराची तपासणी केली. यावेळी २० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. दारूची तस्करीसाठी वापरात येणारी दुचाकी व २० लिटर मोहफुलाची दारू जप्त करीत त्याच्यावर देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक डॉ. जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.