कोरोना च्या काळात गरजुंना मदतीला धावून आले जेसा मोटवानी 

प्रतिनिधि/अंकुश पुरी

देसाईगंज/..आज 12 वा दिवस गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन व्यवस्था करण्यात येत आहे त्याच सोबत गरजू रुग्णांना रक्तदान, रुग्णांना बेड,ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी मदत कार्य व प्रत्येक अडचणी साठी युवक काँग्रेस सदैव आपल्या सेवेत, 24 तास मदतीचा हात या उपक्रमाला वडसा नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष जैसा भाई मोटवानी यांनी भेट घेतली व या उपक्रमा बद्दल जैसा भाऊंनी युवक काँग्रेस कौतुक करून, काँग्रेस कार्यकर्ते गरजुना मदत करा असे आव्हान केले.