अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दोन व्हेंटिलेटर किट उपलब्ध करून देण्यात आले

 

माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते

रा.काँ. चे शाहीन भाभी हकीम यांचीही उपस्थिती

कोरोना काळात व्हेंटिलेटर किट उपयुक्त ठरणार!

अहेरी तालुका प्रतिनिधी // इरफान शेख
अहेरी:- येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवार 5 मे रोजी दोन ऑक्सिजन व्हेंटिलेटर किट माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.संजय उमाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहीन भाभी हकीम उपस्थित होते.
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी कोरोनाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रासाठी विविध साहित्य सामुग्रीची मागणी केले. मागणीची दखल घेण्यात आली असून त्यानुसार अहेरी व सिरोंचा येथे ऑक्सिजन व्हेंटिलेटर किट पुरविण्यात आले.
विशेष म्हणजे अहेरी उपजिल्हा रुग्णालयासाठी एक रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती फार गंभीर होत असल्याने आरोग्याची योग्य व्यवस्था व रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम पुढाकार घेत असून धडपड करीत आहेत.
येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन व्हेंटिलेटर किट देतेवेळी रा.काँ. चे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, मखमुर शेख व रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.