उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांचेविरुद्ध कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

श्री. संजयकुमार डव्हळे, उपविभागीय अधिकारी, गोन्डपिपरी/ बल्लारपूर या अधिकार्याच्या बेशिस्त व उर्मट वागणूकितून महसूल कर्मचारी श्री. सुनिल चान्देवार यांचेविरुद्ध दाखल केलेला खोटा एफ. आय. आर. रद्द करुन श्री. संजयकुमार डव्हळे यांना तात्काळ निलंबित करण्याबाबत निवेदन मान. जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांना जा. क्र./चंजिमकसं/2021/10 दिनांक:05/05/2021 रोजी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी, संघटना, जिल्हा- शाखा चंद्रपुर च्या वतीने देण्यात आले.