
बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
जगभरात थैमान माजविलेल्या कोरोना विषाणू संसर्गपासून स्वत:ला ठेवन्याकरीता विनाकारण घराबाहेर पडू नये. आवश्यक कामाकरिता घराबाहेर जातांना तोंडावर मास्क बांधावा. एक दुसर्याला भेटतांना 2 मिटर पर्यंतचे अंतर पाळावे. ह्स्तांदोलन करू नये. दिवसातून अधिकाअधिक वेळ साबनाने हात स्वच्छ धुवावे.
अश्या साध्या पध्दतीने आपल्याला कोरोना विषाणू संसर्गपासुन बचाव करता येतो. अशी जनजागृती मुल तालुकामधील बोरचांदली, राजगड, भोपार्ला, फीस्कुटी, विरई , गडीसूर्ला ह्या ग्रामीण भागात करण्यात आली व गरजू लोकांना मोफत ” मास्क ” वितरण करण्यात आले.