साईबाबा-शिवाजी नगर वार्डत अंदाजे 100 ते 150 ग्राहकांना पाणी सुरळीत द्यावे अशी मागणी

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि

साईबाबा- शिवाजी नगर वार्डत अंदाजे 100 ते 150 ग्राहकांना मागील तिन चार महिन्यापासून घरातील नळांना पाणी सुरळीत येत नाही. करिता तेथील नागरीकांनी 1 ते 10 मुद्द्यावर निवेदन मान. उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग,बल्लारपूर जिल्हा: चंद्रपुर यांना दिले आहे व पाणीपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली आहे.