नागरिकांनी वैक्सीनेशन करुन कोरोनावर मात करावी- श्री. हरिश शर्मा

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

दिनांक:03/04/2021 रोजी बल्लारपुर शहरातील नाट्यगृहात सुरू असलेल्या वैक्सीनेशन केंद्राला बल्लारपुर शहराचे नगराध्यक्ष मा. हरीशजी शर्मा यांनी भेट दिली. या केंद्रावर फक्त 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींचे लसिकरण करण्यात येते. या केंद्रावरील व्यवस्थेची पाहणी करुन काही महत्वाच्या सुचना हरीशजी शर्मा यांनी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी यांना केल्या. गर्दी होणार नाही याची काळजी घेत सुरक्षीत अंतर राखण्यासठी तसेच मास्क वापरण्याची सक्ती करण्यात यावे, असे सुचना केल्या यावेळी नगर परिषद चे स्वच्छता व आरोग्य सभापती श्री. येलयाजी दासरफ, भाजपा शहर अध्यक्ष श्री. काशिनाथ सिंह, नगर परिषदेचे कर्मचारी श्री. हाडके, श्री. शब्बीर अली व वैक्सिनेशन करणारी चम्मू तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी हरीश शर्मा यांनी शहरातील नागरिकांनी वैक्सिनेशन करुन घेत कोरोनावर मात करित लढा देण्याची विनंती केली.