बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर मेडिकेअर सोल्युशन

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

रेल्वेने प्रवास करतांना प्रवासी अनावधनाने मास्क व साॅनिटायझर विसरतात. यासाठी सेंन्ट्रल रेल्वे, नागपूर डिव्हीजन कोविड प्रतिबंधक गियर्स व बेडरोल वेंडींग कियोस्क द्वारा मेडिकेअर सोल्युशन, पुणे यांचे तर्फे बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर मेडिकेअर सोल्युशन मधे मास्क व साॅनिटायझर वाजवी दरात उपलब्ध करून दिले आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे कु. अंजली पिंजरकर व कु. पुजा शेट्टी यांनी सांगितले आहे.