बल्लारपूरात एकाचे नावाची लस दुसर्याला माहितीच्या अधिकारात पितड उघड, कार्यवाहीची मागणी

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि )

दिनांक:16/04/2021 रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वस्ती विभाग, बल्लारपूर येथे झालेल्या लसीकरनात भोंगळ कारभार माहितीचे अधिकार अधिनियम 2005 नुसार उघडकीस आला असून, आफलाईन नोंदणी करण्यात आलेल्यात एकांची नावे समाविष्ट आहे. मात्र आनलाईन नोंदणीने लसीकरण करताना भेदभाव करुन त्यांना लस न देता दुसर्यांना लसीकरण करण्यात आले. त्यांना मात्र 4 तास बसवून ठेवन्यात आले. गावातील लोक सोडुन बाहेरगावच्या चंद्रपुर, पोंभुर्ना, गोंडपिपरी, राजुरा येथिल आप्तगनांना फोन करून बोलावून लसीकरण करण्यात आले. त्या दिवशी लसीकरण केंद्रावर फार गर्दी होती. लसीकरण करनार्यांना दाटीवाटींनी बसवुन गोंधळ चालू होता. करिता वैद्यकिय अधिकारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, बल्लारपूर यांची चौकशी करुन कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे.