शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील ओपीडी निशुल्क

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील ओपीडी शनिवार (दि.1 मे) पासून कोरोनाबाधित व ईतर रुग्णांकरीता निशुल्क सुरु करण्यात येत आहे. गरजू रूग्णांनी या मोफत ओपीडी चा लाभ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तर सांयकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत घ्यावा. असे आवाहन डॉ. विवेक नि. शिंदे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवि शिंदे यांनी केले आहे.