टायगर ग्रुप आलापल्ली तर्फे दंतेवाडा मध्ये नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण 

 

आलापल्ली;-२६ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दलाच्या वाहनावर नक्षल्यांनी आयईडी हल्ला केला असून यामध्ये ११ जवान शहीद झाले आहेत.
मतृभमीच्या रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान, आपल्या शूर सैनिकांचे, भारतमातेच्या शूर सुपुत्रांचे सर्वोच्च बलिदान देशाच्या स्मरणात सदैव अमर राहिल. की ती वेदनादायक घटना देश विसरनार नाही. विर बाबुराव चौक आलापल्ली येथे टायगर ग्रुप कडून विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आले, कॅण्डल लावून फुल अर्पण करून ५ मिनिटाचे मोन धारण करून श्रद्धांजली वाहिली.
अमर रहे ..! अमर रहे..! वीर जवान अमर रहे ..!
या जय घोशने नारे लवण्यात आले. यात गावातील प्रथम नागरिक सरपंच शंकर मेश्राम, गावातील प्रतिष्ठित नागरिक, टायगर ग्रुप नारीशक्ती व टायगर ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.