खुनाच्या गुन्हयात तीन वर्षापासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

 

 

 

#khabardarmaharashtra#onlinenewsportal#sports#education#political#crime

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील गुन्हयांमध्ये पाहिजे असलेले व फरारी आरोपी पकडण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने श्री. अरूण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी सहायक पोलीस निरीक्षक श्री. पवार स.पो.नि. श्री. भोरे, व पोउनि श्री. शिंगाडे यांचे विशेष पथक तयार करून पाहिजे व फरारी आरोपींना पकडण्याचे आदेश दिले होते.

• दिनांक ११/०४/२०२३ रोजी श्री. अरूण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना बातमी प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील खुनाच्या गुन्हयात आरोपी इसनु / विष्णु अशोक भोसले रा. महादेव नगर फलटण हा माकडमाळ फलटण येथे येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी विशेष पथकास सदर ठिकाणी जावून आरोपीस पकडून पुढील कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे विशेष पथकाने सदर ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला, त्यावेळी विशेष पथकातील पोलीसांना नमुद आरोपीने पाहिल्याने तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यास पकडले व त्यास पुढील कारवाई करीता फलटण शहर पोलीस ठाणे गुरनं. ३२५ / २०२० भादंवि कलम ३०२, ३०७ वगैरे या गुन्हयाच्या कामी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदर कारवाई मध्ये श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक श्री. पवार, श्री. भारे, पोलीस उप निरीक्षक, श्री. शिंगाडे, सहायक फौजदार श्री. तानाजी माने, श्री. सुधिर बनकर, पोलीस हवालदार साबीर मुल्ला, , मंगेश महाडीक, अमोल माने, पोलीस नाईक अमीत सपकाळ अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, शिवाजी भिसे, म.पो.ना. मोनाली निकम पो.कॉ. स्वप्नील दौंड, स्वप्नील माने, वैभव सावंत, मोहसिन मोमीन यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.