विक्रमगड तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी.

 

विक्रमगड तालुका प्रतिनिधी // समीर आळशी

विक्रमगड तालुक्यात रमजान अर्थात ईद -उल -फित्र हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. या दिवशी नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. मुस्लिम बांधवांच्या सणा पैकी एक मोठा सण म्हणजे रमजान ईद होय. मुस्लिम समाजाचे वर्षाचे जे १२ महिने आहेत त्यातील ९ वा महिना म्हणजे रमजान होय. उपवासाचा महिना म्हणून ओळखला जातो. या उपवासाची सांगता ज्या दिवशी केली जाते तो दिवस म्हणजे ईद.
विक्रमगड येथे रमजान ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांना विक्रमगड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप गीते ,उपनिरीक्षक सतीश जगताप, विक्रमगड नगरपंचायत उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, आर.पी.आय चे राहुल मोरे या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.