तालुका प्रतिनिधी // समीर आळशी
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा लोकसभा प्रवास योजना टप्पा-२ चा शुभारंभ नुकताच मनोर येथे करण्यात आला.
सायलेंट रिसॉर्ट मनोर येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या समवेत लोकसभा प्रभारी नरेंद्र पवार, भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील ,वसई जिल्हा अध्यक्ष राजन नाईक ,ज्येष्ठ भाजपा नेते बाबजी काठोळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात अनुराग ठाकूर यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासन काळातील अनेक लोकाभिमुख योजनांचा तपशील दिला व त्या योजना जनतेपर्यंत जास्तीत जास्त कशा पोहोचतील याबाबत कार्यकर्त्यांना सूचना करून मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पालघर जिल्ह्यातील लोकसभा कोर कमिटीचा आढावा घेतला. तसेच महिला मोर्चा व युवा मोर्चा कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली. आभण येथे आर. एस .एस. च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा करून वसई येथील दिवंगत स्वप्निल किनी यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. जैन मंदिर शिरसाट फाटा येथे लाभार्थी व सोशल मीडिया टीम ची बैठक घेतली.