दहीगाव जांबीपाडा ते पानोतपाडा नदीवर पूल नाही म्हणून रहिवासी अडचणीत
दहीगांव पानोतपाडा येथे 1 हजार लोक संख्या पेक्षा जास्त रहिवासी राहत असून तिथे सुसरी नदी लागते पावसाळ्यात पुरामुळे गावकऱ्यांना देवाण-घेवान करण्यास व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जमत नाही म्हणून जांबीपाडा या ठिकाणी घरात शाळा भरावी लागते या समस्याचे निवारण करण्यासाठी कॉग्रेस पक्ष कमिटी पालघर जिल्हा यांनी पाहणी केली व आश्वासन देखील दिले आहे की लवकरच मंजुरी मिळाली या आम्ही शांत बसणार नाही गरज पडली तर आंदोलन देखील करु असे सांगितले आहे तेव्हा तिथे शैलेश कोरडा धानिवरी गावचे सरपंच, नरेश कोरडा ओसरविरा गावाचे सरपंच, प्रफुल्ल पाटील पालघर जिल्हा अध्यक्ष, योगेश नम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, धानिवरी गावचे सदस्य, ओसरविरा गावाचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते