विक्रमगड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

 

 

विक्रमगड तालुका प्रतिनिधी // समीर आळशी

 

 

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती विक्रमगड येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील संत रोहिदास सभागृहात संपन्न झालेल्या या समारंभात व्यासपीठावर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, कुणबीसेना प्रमुख विश्वनाथ पाटील, विक्रमगड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप गीते ,पंचायत समिती सभापती यशवंत कनोजा, भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली, विक्रमगड नगरपंचायत उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, संत रोहिदास समाज उन्नती मंडळ विक्रमगड तालुका अध्यक्ष संजय भोईर, नगरसेवक निकेत पडवळे, मनोज वाघ, अमोल भडांगे ,नगरसेविका वैशाली तामोरे ,आर .पी .आय (आठवले गट) जिल्हा कार्याध्यक्ष रत्नाकर भालेराव ढाले गुरुजी, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रवींद्र भोईर, नाना अहिरे व रमेश दोंदे यांनी केले. सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून व बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचे महत्त्व विशद केले .प्रमुख वक्ते सुजय कैलास जाधव यांनी सर्वांना बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचे वर्णन करून त्यांनी सांगितलेले शिक्षणाचे महत्त्व विशद केले .शेवटी आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
त्यानंतर सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य -दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले होते. मिरवणुकीत बाबासाहेबांचा जयजयकार करण्यात आला. या मिरवणुकीत प्रमुख आकर्षण तारपा नृत्य कलाकार ही सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वीरित्या होण्यासाठी राहुल मोरे, श्रीकांत गायकवाड, सुहास ढाले ,सौरभ दोंदे यांनी विशेष सहकार्य केले.