विक्रमगड येथे” प्रज्ञा शोध परीक्षा”या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.

 

जिल्हा परिषद पालघर अंतर्गत पंचायत समिती विक्रमगड शिक्षण विभाग तर्फे “प्रज्ञाशोध परीक्षा”या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पंचायत समिती विक्रमगड सभागृह येथे संपन्न झाला.
याप्रसंगी प्रकाश निकम अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर, पंकज कोरे उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर ,भानुदास पालवे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर, संदेश ढोणे सभापती बांधकाम व आरोग्य जिल्हा परिषद पालघर ,संदीप पावडे कृषी व पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद पालघर, यशवंत कानोजा सभापती पंचायत समिती विक्रमगड, हनुमंतराव दोडके गटविकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड, विक्रमगड पंचायत समिती सदस्य मनोज बोरसे, सुभाष भाये, अंजली भोये, नम्रता गोवारी ,काश फाउंडेशनचे अवकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी बापू शिंनगारे यांनी केले. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी जिल्हा परिषद शाळेच्या काही शिक्षकांनी सहाय्य केले तर काश फाउंडेशन, विपरा, अध्ययन संस्था मुंबई व इस्टिम कंपनी अलोंडा यांनी सहकार्य केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, सभापती जिल्हा परिषद पालघर संदेश ढोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी पालवे, अवकाश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालघर जिल्ह्यात उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध असणारे अनिल पटारे सर त्यांनी केले.