पोस्टे एटापल्ली येथे नवीन सार्वजनिक वाचनालय इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा

 

पोस्टे एटापल्ली परिसरातील लोकांचा वाचनालय उभारणीत स्वयंस्फुर्तीने सहभाग.

गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम भागात कार्यरत असलेल्या सर्व पोस्टे / उपपोस्टे / पोमकें हद्दीतील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांच्या शिक्षणासह बौद्धीक कला – गुणांना वाव मिळावा, त्यांच्या वैचारिक क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या विचारात बळ यावे व नक्षल विचारधारेकडे आकर्षीत होवू नये. तसेच त्यांना जगात घडत असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय / प्रादेशिक / स्थानिक घडामोडी, शासकिय योजना इ. बाबत माहिती मिळावी व वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी यासाठी गडचिरोली पोलीस दल मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या संकल्पनेतून “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत पोस्टे एटापल्ली परिसरातील नागरिक व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी व श्रमदानातुन एटापल्ली येथे नवीन इमारतीमध्ये सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मीती करण्यात आली. सदर वाचनालयाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन आज दिनांक १४/०४/२०२३ रोजी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा. यांचे उपस्थितीत एटापल्लीचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक श्री. ज्ञानेश्वर कोवे, अध्यक्ष गायत्री परिवार एटापल्ली यांच्या हस्ते सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला. सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी संविधान उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास पोस्टे एटापल्ली हद्दीतील ६०० ते ७०० च्या संख्येने नागरीक उपस्थित होते. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच पोस्टे पासुन ते सार्वजनिक वाचनालयापर्यंत पारंपारीक रेला नृत्यासह ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरुन शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरीकांसह ग्रंथदिंडी वाचनालयापर्यंत काढण्यात आली. यादरम्यान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संविधान चौक नामफलकाचे अनावरण करण्यात आले. व इतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. वाचनालयामध्ये स्वतंत्र अभ्यासिका, मोफत वाय-फाय ची सुविधा, बैठक व्यवस्थेकरीता टेबल, चेअर, बुक ठेवण्याचे कपाट व इतर मुलभुत सुविधेसह सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करुन देण्यात आले.