उपजिल्हाप्रतिनिधी//मारोती कोलावार
मूलचेरा;-गोमणी परिसरात मागील एक महीन्यापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. गोमती परिसरातील गोमणी, श्रीरामपूर, गोविंदपूर, हरिनगर, मथुरानगर, चिंचेला कि कोडीगावं, आंबटपल्ली तसेच सुंदरनगर परिसरातील सुंदरनगर, भगतनगर, भवानीपूर, श्रीनगर, खुदिरामपल्ली या भागातील बहुतांश शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाला व मक्याचे पिक घेत असतात. परंतू या भागात क मागील एक महिन्या पासून विजेचा लपंडाव सुरु असल्यान शेतकरी हवालदिल झालेला आहे कारण भर उन्हाच्या दिवसात पिकाला वाचविणे हे मोठे आव्हाहन असते। अशातच विजेचा लपंडाव सुरु असल्याचे शेतकयांचे मक्याचे पिक पाण्याअभावी वाढून गेले आहे भाजीपाला लागवर करणात्यांची देखील मोठ्याप्रमाणात चिंता वाढलेली आहे
उन्हाचे दिवस असल्याने दिवसभर उन्हाचा पारा हा 40°C तर कधी जास्त होत असतांना 1. विजेच्या लपंडावामुळे नागरीकांना उन्हामुळे लाहीलाही व्हावे लागत आहे
गोमणी परिसरात पावसाळ्याच्या दिवसात विजेचा लपंडाव पाहायला मिळतो परंतू भर उन्हाच्या दिवसात विजेच्या या लपंडावामुळे नागरिक व शेतकरी मोठ्या प्रमाणात वस्त झालेले आहेत. गोमणी बिट लाईनमन साईनाथ आरके यांना खबरदार महाराष्ट्र उपजिल्हा प्रतिनिधी यांनी भ्रमणध्वनी द्वारें संपर्क करुन वारंवार विज जान्यामागचे कारण विचारले असता आजकाल मानसाचाच भरोसा नाही हे तर लाइन आहे याचा काय भरोसा आहे जी कधी येते तर कधी नाही आम्हच्या हातात काहीच नाही आहे अशाप्रकारचे उत्तर दिले जात आहेत.