भामरागड येथील वस्तीगृह अधीक्षक भीमराव अवथरे ५ हजाराची लाच घेतांना अटक

 

#khabardarmaharashtr#onlinenewsportal#social#political#education#crime

भामरागड;- भामरागड येथील समग्र शिक्षा अभियानाच्या वस्तीगृह अधिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ५ हजाराची लाच स्वीकारताना पकडल्याची घटना उघडीस आली आहे सदर लाच स्वीकारणाऱ्या अधिक्षकाचे नाव (भीमराव उद्धव अवथरे ) वय ५२ वर्ष असे आहे

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की तक्रारदार हा भामरागड येते वस्तीगृहात कंत्राटी चौकीदार म्हणून कार्यरत होता त्याच्या मानधनात दरमहा तीन हजार रुपये वाढ करून कंत्राटी चौकीदार पदावर नियमित करणार असे बोलून भीमराव अवथरेनी ५ हजार रूपयाची लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याकारणाने त्याने गडचिरोल्ली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व त्या नुसार अधिकाऱ्यांनी आज सापडा रचून अवथरेला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

सदरची कारवाही एसीबीचे पोलीस उप अधीक्षक अनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड सहायक फौजदार प्रमोद ढोरे हवालदार नत्थु धोटे श्रीनिवास संगोजी स्वप्नील बाम्बोडे किशोर जैजारकर, संदीप घोरमोडे किशोर ठाकूर संदीप उडान विद्या मशाखेत्री ज्योशना वसाके तुळशीराम नवघरे यांनी केली