आरोग्य विभागाकडून कोरोना मॉक ड्रिल

Khabardarmaharashtra#onlinenewsportal#sports#education#political#crime
भंडारा दि.12 : केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूचनेनुसार देशभरात काल आणि आज वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना मॉक ड्रिल करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची सुसज्जता तपासण्यात आली. मॉक ड्रिल द्वारे कोरोनाच्या प्रतीकारासाठी आवश्यक असलेल्या सर्व आरोग्यसेवांची उजळणी केली. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये 482 खाटा उपलब्ध असून त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन व आंतर रुग्णांसाठी खाटा तसेच संबंधित औषधांची उपलब्धता आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा व अंतर्गत संस्थांमध्ये स्थित असलेल्या PSA Oxygen Plant ची माहिती
जिल्हा रूग्णालय, भंडारा हे 482 खाटांचे रुग्णालय असून येथे स्वतंत्र कोविड रुग्णालय आहे. जिल्हा रुग्णालयात एकूण 9 PSA Oxygen Plant आहेत. उपजिल्हा रुग्णालय साकोली अंतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, तहसील- साकोली येथे 600 LPM चे PSA Oxygen Plant आहे. उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे 600 LPM चे PSA Oxygen Plant आहे. ग्रामीण रूग्णालय, पवनी अंतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, तहसील- पवनी येथे 600 LPM चे PSA Oxygen Plant आहे. ग्रामीण रूग्णालय, लाखांदूर अंतर्गत मालवणी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह येथे 600 LPM चे PSA Oxygen Plant आहे. ग्रामीण रुग्णालय, मोहाडी येथे 200 LPM चे PSA Oxygen Plant आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, केसलवडा, जिल्हा भंडारा येथे 600 LPM चे PSA Oxygen Plant आहे.
वरीलप्रमाणे भंडारा जिल्ह्यात एकूण 15 PSA Oxygen Plant आहेत. संपूर्ण प्लाँट सुव्यवस्थित स्थितीत असून कार्यरत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. नागरिकांनी देखील आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून लक्षणे जाणवताच जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.