Khabardarmaharashtra#onlinenewsportal#sicial#political#education#crime
द मौजा पारडी ता. जि. गडचिरोली येथे बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अनिरुद्ध वनकर यांच्या “मी वादळ वारा” या शिव-भीम गीताच्या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी मोठया संख्येने उपस्थित प्रेक्षकांना उद्देशून सांगितले कि, रय्यतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात कोणत्याही प्रकारचा धर्मभेद वा जातीभेद न करता सर्वांना समान न्याय व समान संधी देऊन समतेचे राज्य स्थापित करण्याचे मोलाचे कार्य केले. हाच समतेचा विचार क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहितांना समता, बंधुता, स्वतंत्रता, संहीष्णूता, धर्मनिरपेक्षता व न्याय या बाबी प्रकर्षाने विहित केल्या. परंतु आज राज्यकर्त्यांकडूनच या संवैधानिक मूल्यांची पायमल्ली होत आहे. मतं मिळवून सत्तेत राहण्यासाठी समाजात जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे. सर्वांना समतेच्या आधारावर समान संधी, न्याय व प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने बहुजनांसाठी आरक्षणाची तरतूद संविधानात बाबासाहेबांनी केली, परंतु सार्वजनिक उपक्रमांचे सरसकट खाजगीकरण करून, ल्याट्रल नियुक्ती द्वारे व आऊटसोर्सिंग द्वारे कंत्राटी पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून अप्रत्यक्षपणे आरक्षण संपऊन वंचितांना संविधानात विहित समान न्याय, संधी व प्रतिनिधित्व नाकारले जात आहे. लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडविले जात आहे. संसदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिले जात नाही. सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर दिले जात नाही. विचाराच्या व बोलण्याच्या अभिव्यक्तीवर दडपण आणले जात आहे. संसदेत दिलेले भाषण असंसदिय नसतांना सुद्धा कामकाजतून काढून टाकणे, घोटाळ्यात लिप्त लोकांबबत प्रश्न विचारल्यावर खासदारकी रद्द केली जाते. अशी गळचेपी होत असेल व लोकशाही मूल्य पायदळी तुडविले जात असतील तर अश्या लोकांना धडा शिकवीला पाहिजे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.