देसाईगंज – तालुक्यातील शिवराजपुर येथे स्थानिक ग्रामवासिय यांच्या पुढाकाराने खासदार अशोकजी नेते यांचे स्थानिक विकास निधी अंतर्गत बुद्ध विहार समाज सभागृहाचे लोकार्पण सोहळा तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापनेचा उद्घाटन सोहळा खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते व आमदार कृष्णाभाऊ गजबे यांच्या अध्यक्षतेखाली मौजा-शिवराजपुर ता.देसाईगंज जि.गडचिरोली येथे संपन्न झाला.
तसेच तुफान विनोदी समाज प्रबोधनकार, दूरदर्शन, झी मराठी कलाकार तुषार सुर्यवंशी नागपूर यांचाही कार्यक्रम जेतवन बौद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने उद्घाटन म्हणुन खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,आमदार कृष्णाजी गजबे,भाजपाचे जेष्ठ नेते तथा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, माजी सभापती परसरामजी टिकले, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पारधी,सरपंच सुषमाताई सय्याम, से.नि.अभियंता विजय मेश्राम, केंद्रप्रमुख विजय बनसोड, बुद्धविहार समितीचे अध्यक्ष शिवदासजी रामटेके, सचिव बनसोडे, माजी. जि.प. सदस्य दिगंबर मेश्राम, पोलीस पाटील हेमंत दर्वे,ग्राम.पं. सदस्य प्रमोद झिलपे, ग्रा.पं.दिपक प्रधान, वासुदेव झिलपे, आरोग्य सेविका अनिता शेंडे,प्रमोद बेदरे,तसेच तुफान विनोदी समाज प्रबोधनकार दुरदर्शन, झी मराठी कलाकार तुषार सुर्यवंशी नागपूर व जेतवन बौद्ध विहार समिती चे बांधव तथा समस्त गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना खासदार अशोकजी नेते यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणे करिता आपल्या पवित्र स्थळी बुद्ध विहारात जाऊन नमन करता यावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज या शिवराजपुर येथे पवित्र स्थळी लोकार्पण सोहळा चा उद्घाटन झाला याकरिता चांगले विवेकबुद्धी विचार या बुद्ध विहारात आत्मसात करून तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अवलंब करून चांगला संदेश घ्यावा.तसेच
शिक्षणाशिवाय पर्याय नाही. समाजाला चांगली दिशा देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे चांगले विचार दिले ते आचरणात आणा. महापुरुषांची आत्मचरित्रे वाचावीत, असे प्रतिपादन या प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.
तसेच आमदार कृष्णा भाऊ गजबे यांनी शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी वाचन केले पाहिजे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही.शिक्षणात वाचनाचे महत्व असुन लायब्ररीच्या माध्यमातून वाचन करणे आवश्यक आहे.आजच्या काळात वाचन महत्त्वाचे आहे.असा मौलाचा संदेश दिला.
तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय घोषाने मूर्तीची प्रतिस्थापना बुद्ध विहार लोकार्पण सोहळा पार पडला.
या व्यतिरिक्त अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले, यावेळी शिवराजपुर येथील स्थानिक नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी
जेतवन बुद्ध विहार समिती पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी अथक प्रयत्न केले,