आर्वी:दिनांक २९/४/२०२२आर्वीतील एल .आय. जी. कॉलनी व कन्नमवार नगर मधील गेल्या 25 ते 30 वर्षापासून रस्ते व नाल्या च्या प्रलंबित समेस्येसाठी या दोन्ही वॉर्डातील नागरिक आर्वी पालिका कार्यालयासमोर 1 मे महाराष्ट्र दिनी बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे
गेल्या 30 वर्षापासून आर्वीतिल सर्वात जुनी कॉलनी असलेल्या एल .आय. जी .कॉलनी व कन्नमवार नगर वार्डात गेल्या कित्येक वर्षापासून रस्ते व नाल्या नसल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या दोन कॉलनीतील भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे या वार्डातील रस्ते पूर्ण खोदून ठेवल्याने नागरिक व वृध्द ,बालकांना ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो,दर पावसाळ्यात याचा मोठा फटका रहिवासी नागरिकांना सहन करावा लागतो या प्रलंबित मागण्यांबाबत लोकप्रतिनिधी पालिका प्रशासन महसूल विभागाला वेळोवेळी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते परंतु अद्याप नागरिकांच्या या समस्या निकाली न लागल्याने या दोन्ही वार्डातील रहिवासी 1 मे ला आर्वी नगर पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे या दोन्ही वार्डातील नागरिकांनी वेळोवेळी समस्या निकाली लागण्या संबधित पालिका प्रशासनाने आश्वासन दिले होते परंतु अद्याप पावेतो या दोन्ही वार्डातील समस्या निकाली न निघाल्याने 1 मे ला आमरण उपोषणाला बसणार आहे याबाबत संबधित विभागाला माहिती देण्यात आली आहे