वर्धा, दि.29: जिल्हा परिषद येथील सिंधुताई सभागृह येथे दि.1 मे रोजी पालकमंत्री सुनील केदार यांच्या जनता दरबारचे आयेाजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री नागरीकांच्या समस्या जाणून घेतील.
जनसंपर्क तथा जनता दरबार मध्ये जिल्हयाचे पालकमंत्री सुनील केदार लोकप्रतिनिधी नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या व तक्रारी समजून घेऊन त्याचे निराकरण करणार आहे. त्यामुळे नागरिकांना काही समस्या, अडीअडचणी व तक्रारी असल्यास लेखी स्वरुपात अर्ज सादर करुन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद येथील सिंधुताई सभागृह येथे अयोजित जनता दरबारात सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांनी केलेल्या अर्जावर पालकमंत्री सुनिल केंदार प्राप्त झालेल्या अर्जावर सबंधित विभागाकडून निराकरण करुन घेणार आहे.