रमजान ईद शांततेने पार पडावा या करिता गांधी चौक येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली

 

 

पोलीस अधीक्षक वर्धा यांचे मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पोलीस स्टेशन आर्वी येथे आज दिनांक 29.04.2022 रोजी रमजान ईद उत्सव शहरांमध्ये व ग्रामीण भागात शांततेत पार पाडावा याकरिता सकाळी 09.45 वा. गांधी चौक आर्वी येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली रंगीत तालीम मध्ये पोलीस स्टेशन आर्वी, तळेगाव, कारंजा, आष्टी असे एकूण 5 अधिकारी, 37 अमलदार पोलीस मुख्यालय वर्धा येथून 2 अमलदार DI तसेच ठाणेदार भानुदास पिदुरकर नायब तहसीलदार विनायक मगर, अमोल कदम,तहसील कार्यालय आर्वी, अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका सहभागी झाले होते रंगीत तालीम वेळीं गोकुळसिंग
पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव यांनी भेट दिली रंगीत तालीम संपल्यानंतर आर्वी शहरातील मार्केट परिसर, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन मुख्य भागातून रूट मार्च करून 11:20 वा. पोलीस स्टेशन परत येऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला