अब्दुल सत्तार व अमोल मिटकरी यांचा प्रतिमेला जोडे मारत केले आंदोलन

 

 

#Khabaradarmaharashtra,online news,latest news politics,social,education, corona,crime#

धुळे : धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार व आ. अमोल मिटकरी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात धुळ्यात भाजपा आक्रमक झाली असून मंत्री अब्दुल सत्तार व आ.अमोल मिटकरी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी मंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंदू देवता असलेल्या हनुमानाच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल झाली होती. तसेच राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्रभरात सत्तार आणि मिटकरी यांच्या विरोधात आंदोलने होत असून दोघांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार व अमोल मिटकरी यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते हिरामण गवळी, विनोद मोरानकर, कुणाल चौधरी, दिनेश बागुल, गुलशन उदासी, राकेश कुलेवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.