वर्धा जिल्हा भाजयुमो चे कार्य कौतुकास्पद : प्रदेश सरचिटणीस शिवानी दाणी

 

भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्हा कार्यकारिणी बैठक दिनांक २७-४-२०२२ रोजी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवानी ताई दाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

भाजयुमो प्रदेश सरचिटणीस शिवानी दाणी या सध्या महाराष्ट्र्याच्या दौऱ्यावर आहे.
या अनुषंगाने वर्धा येथे संघटनात्मक आढावा जिल्हा कार्यकारिणी बैठक घेण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील जी गफाट,जिल्हा महामंत्री प्रशांत जी बुर्ले,भा.ज.यु.मो. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व वर्धा चे प्रभारी रघुवीर जी अहीर , प्रदेश सचिव अंकुश ठाकुर ,पूर्व विदर्भ युवा वाॅरीयर्स संयोजक देवा डेहनकर,प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील कठाळे,युवा वॉरियर्स जिल्हा संयोजक वैभव तिजारे,महामंत्री गौरव गावंडे, राहुल करंडे, अवेझ खान,प्रामुख्याने उपस्थित होते.
दाणी यांच्यातर्फे सर्व मंडळाचा युवा वॉरियर्स शाखेचा आढावा घेण्यात आला.महाराष्ट्रात वर्धा जिल्हा युवा मोर्चा हा अव्वल स्थानी असून 384 युवकांना रोजगार देऊन त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम युवा मोर्चा ने केलं यासाठी भाजयुमो जिल्हाध्यक्ष वरूण पाठक यांचे अभिनंदन केले.येणाऱ्या काळात सर्व पंचायत समिती व सर्व वॉर्डात युवा वॉरियर्स शाखा उदघाटीत करण्यात येईल अशी माहिती वरूण पाठक यांनी दिली. यावेळी कृष्णा जोशी, अविनाश बाभूळकर, करण गेलानी,रजत बत्रा,विशाल उराडे, शुभांगी पुरोहित, प्रिया ओझा, मंजू पाल,प्रवीण पवार,नितीन मेश्राम,प्रसाद फटींग,रजत शेंडे, जितेंद्र ठाकरे, मोहित उमाटे,रोशन पांगुळ, अतुल देशमुख,सोनू पांडे, विठू बेनिवार, अमोल गवळी, निखिल काटोरे, अंकित टेकाडे,वैभव श्यामकुवर, जिल्हा पदाधिकारी ,मंडळ अध्यक्ष इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.