नितीन नेने यांची मच्छिमार सेल जिल्हाउपाध्यक्ष पदी नियुक्ती

 

आमदार दादाराव केचे यांनी नितीन नेने यांना मच्छीमार सेल जिल्हा उपाध्यक्ष पदीचे नियुक्ती पत्र दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष सुनिल ज्ञानेश्वरराव गफाट यांच्या स्वाक्षरी असलेले नियुक्ती पत्र देण्यात आले.

आमदार दादाराव केचे यांनी नव नियुक्ती पत्र दिलेल्या नितीन नेने यांची नियुक्ती झाल्याने आमदार दादाराव केचे यांनी अभिनंदन केले. भावी वाटचाली करता शुभेच्छा देत मच्छीमार सेलच्या माध्यमातून मच्छीमारी व्यवसाय संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा तसेच या व्यवसायाशी निगडीत असल्यांना न्यायिक बाबींची पूर्तता करावी. भारतीय जनता पक्षाने दिलेल्या जवाबदारीचे पालन होण्यासाठी प्रयत्नरत राहावे असे नमुद केले.

या प्रसंगी जितेंद्र मुडे, निलेश देशमुख, निखिल कडू इत्यादींची उपस्थिती होती.