आमदार अमोल मिटकरी ने ब्राह्मण समाजात केलेल्या विधानाबाबत आर्वीच्या ब्राह्मणसभा तर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

 

आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथील जाहीर सभेत ब्राह्मणांची खिल्ली उडवून आपत्तीजनक टिप्पणी केल्याबाबत आर्वी येथील उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदन देऊन आमदार अमोल मिटकरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अश्या आशयाचे मागणीचे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी परंपरागत हिंदू विवाह पद्धती वर विशेष टिप्पणी करून हिंदू संस्कार पद्धतीवर चुकीचे आरोप लावून आमदार मिटकरी यांनी आपल्या सांगली येथील दिलेल्या भाषणात चुकीची माहिती दिली आहे हिंदू धर्म पद्धतीच्या अनुसार कन्यादान ह्या विधी वर आपत्तीजनक शब्दप्रयोग करून चुकीचे माहिती सभेत दिल्याने ब्राह्मण समाज दुखी झालेला आहे त्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांच्याविरुद्ध गुन्हा कायम करणे जरुरीचे आहे .
त्याचप्रमाणे याच सभेत मंत्री महोदय धनंजय मुंडे व नामदार श्री जयंत पाटील हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते त्यांनी सुद्धा हसत मिटकरी यांनी दिलेल्या भाषणाला प्रतिसाद दिला.
या आशयाचे आर्वी येथील ब्राह्मण सभा तर्फे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदन देताना प्रेमराज पालीवाल, अनिल जोशी, अँड
वि.टी. देशपांडे, डॉ विनय देशपांडे, विक्री पालीवाल, राजेंद्र पालीवाल, पप्पू जोशी ,विनोद पालीवाल, कल्पेश दवे ,धर्मेश शर्मा, सुनील जोशी ,तरुण दवे ,राजाभाऊ गिरधर, पंकज पालीवाल, पत्रकार उमंग शुक्ला, सनी गौतम, रुपेश पालीवाल ,आनंद पालीवाल ,दर्शन पुरोहित ,गौरव तिवारी यांच्या
सहा सर्व ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.