श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुचरित्र सप्ताहाचे आयोजन

 

आर्वी :स्थानिक कन्नमवार नगर पांडुरंग वसाहत मधील स्वामी समर्थ केंद्रात दी 22 ते 28 एप्रिल दरम्यान गुरुचरित्र पठण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दी.28 ला महाआरती व महाप्रसादाने या सप्ताहाची समाप्ती होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे विनंती आयोजकांच्या वतीने स्वामी समर्थ मंदिराचे श्री.गजानन महल्ले यांनी केली आहे